विरार - नालासोपारा पाण्याखाली
तलावांचा लिलाव ग्रामस्थांनी रोखला
वटार गावातील चार तलावांचा लिलाव वसई-विरार महापालिकेने जाहीर केला होता. मंगळवारी सकाळी उपायुक्तांच्या उपस्थितीत लिलावाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर येथे जमलेल्या ग्रामस्थांनी ही प्रक्रिया बंद पाडली. महापालिकेतून गावे वगळण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे जोपर्यंत गावे वगळली जात नाहीत तोपर्यंत हा लिलाव करू नये, असे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले.
प्रभाग क्रमांक ९ मधील वटार ग्रामपंचायत हद्दीतील दोन तलाव, वरळी तलाव, भोंगाळे तलाव, वरमाळे तलाव या तलावांचा महापालिकेने मासळी सोडणे व मारणे यासाठी २०१०-११ या वर्षासाठीचा लिलाव जाहीर केला होता. लिलावाच्या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी ९ जण वटार येथील सध्याच्या पालिकेच्या ऑफिसमध्ये उपस्थित होते. साडेबारा वाजता उपायुक्त देविदास टेकाळे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळेस नगरसेविका ज्योती ठाकूर यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी आपले उपायुक्तांकडे म्हणणे मांडले.
Nirbhay Aandolan - May 10 / June 10
रणधुमाळी निवडणुकीनंतरची
वसई-विरार महापालिकेच्या पहिल्या महापौरपदी कोण विराजमान होणार, हा मान चारपैकी कोणत्या शहरात की गावात जाणार, याची उत्सुकता वाढलेली असतानाच, विरोधी पक्षनेता कोण होणार, याबाबतही चर्चा सुरू आहे. जनआंदोलन समितीमधून विनायक निकम यांचे नाव चचेर्त आहे.
विरोधी पक्षांत सर्वाधिक जागा जनआंदोलन समितीच्या आल्यामुळे विरोधी पक्षनेता त्यांचाच होणार आहे. निकम हे आमदार विवेक पंडित यांचे नजिकचे सहकारी मानले जातात. नवघर-माणिकपूर शहरात त्यांनी याआधी विरोधी पक्षाचे नेते म्हणून काम केले होते. जनआंदोलन समितीच्या बैठकीत याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. दुसरीकडे, शिवसेनेतही गटनेतेपदावरून शिरीष चव्हाण व वसंत वैती यांच्यात चुरस होणार आहे. चव्हाणांकडे जिल्हाप्रमुख हे पद असल्याने पुन्हा त्यांना गटनेते पद मिळते का, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
काँग्रेसच्या दोन नगरसेविका असून त्यात जो अधिक प्रभावीपणे काम करेल त्याकडे हे पद जाणार आहे. भाजप, मनसे यांचे प्रत्येकी एक नगरसेवक विजयी झाले आहेत. या पदांसाठी इच्छुक असणाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले असून त्यात कोण बाजी मारते, हे लवकरच स्पष्ट होईल.
नगरसेवक लागले कामाला!
चारही शहरे व परिसरातील बविआच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या त्या-त्या क्षेत्रीय ऑफिसमध्ये जाऊन नालेसफाईसहित अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर सोमवारी उपायुक्तांसोबत चर्चा केली. गरज पडल्यास बविआचे आमदार, खासदारही आयुक्तांची भेट घेणार आहेत.
अनेक ठिकाणी नालेसफाईची कामे संथगतीने सुरू असल्याने त्या-त्या विभागातील लोकप्रतिनिधींनी उपायुक्तांशी चर्चा केली. नाले-गटारसफाईचा विषय गंभीर आहे, त्या नालासोपाऱ्यात अर्धवट कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना पाटील यांनी केल्या. कचऱ्याचे ढीग स्वच्छ करा, तंुबलेली गटारे स्वच्छ करा, असे सांगून नगरसेवकांनी कामांचा आढावा घेतला. आचारसंहितेमुळे ज्या कामांचे कार्यादेश अडले होते ते त्वरित देऊन कामे सुरू करण्याचीही सूचना आली. लोकप्रतिनिधींना न जुमानणाऱ्या कर्मचाऱ्यांना समज देण्याची मागणी नारायण मानकर यांनी केली.
काँग्रेस उमेदवारांचा सत्कार
वसई-विरार महापालिका निवडणुकीत बीना फुटर््याडो व छाया पाटील या काँग्रेसच्या दोन उमेदवार विजयी झाल्या. वसई काँग्रेस कमिटीच्या वतीने या नगरसेवकांचा रविवारी सत्कार करण्यात आला. यावेळी ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दामू शिंगडा, आमदार गावीत, ठाणे शहर काँग्रेसचे बाळ पूणेर्कर उपस्थित होते.
जिल्ह्याची लोकसंख्या एक कोटीच्या घरात गेली असून त्या तुलनेत सरकारच्या योजनांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. लोकहितासाठी असलेल्या अनेक योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवून त्याचा लाभ जनतेला मिळवून द्या, असे आवाहन बाळ पूणेर्कर यांनी केले. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. नवीन साळगावकर यांनी सूत्रसंचालन केले, तर समीर वर्तक यांनी आभार प्रदर्शन केले.
More Articles...
Page 1 of 6









