Website of Vasai, Virar

  • Full Screen
  • Wide Screen
  • Narrow Screen
  • Increase font size
  • Default font size
  • Decrease font size
 

Send Gifts, Flowers to Vasai Virar

दिवसा घरफोडी

E-mail Print PDF

माणिकपूर पोलिसांच्या हद्दीत दिवाण मेंशन, पंचवटी नाका या भागात दोन दिवसांपूवीर् दिवसा घरफोडी झाली. दिवाण मेंशन बिल्डिंग नंबर २ मधील रूम नं. १७ मध्ये राहणाऱ्या अक्षता जाधव दुपारी घर बंद करून कामानिमित्त बाहेर गेलेल्या असताना त्यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ६६ हजारांचे दागिने चोरून नेले.

वसईत रस्तादुरुस्ती मार्गी!

E-mail Print PDF

आगाशी गावातील चाळपेठ-क्रॉसनाका रस्त्याच्या कामासाठी आम्हीही पाठपुरावा केला असून एमजेपी, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या स्वत: वेळोवेळी भेटीगाठी घेतल्या. बविआच्या सततच्या पाठपुराव्यानेच हे रस्त्याचे काम मागीर् लागले, असा दावा बहुजन विकास आघाडीचे आगाशीतील ज्येष्ठ कार्यकर्ते महेंद कवळी यांनी बोलतांना केला.

आगाशीतील दुर्दशा झालेला चाळपेठ-क्रॉसनाका रस्ता नव्याने होत नसल्याने लोक नाराज आहेत. गेली वर्षभर या रस्त्याचा विषय गावात चचिर्ला जात आहे. महापालिका काम करणार म्हणून स्थानिक नगरसेवक पालिकेकडे विनंती करीत होते. मात्र नवे वर्ष उजाडूनही हे काम होऊ शकले नाही. परिणामी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. रस्त्याचे काम अखेर सुरू झाल्याचे वृत्त शुक्रवारच्या 'मटा'त प्रसिद्ध झाले आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

वसई-विरार उपप्रदेशातील ६९ गावांच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत गावांमध्ये ठिकठिकाणी जलवाहिन्या टाकण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून रस्ते खोदण्यात आले होते. या खोदलेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी एमजेपीने रक्कम मंजूर केली होती. हा निधी झेडपीकडे वर्ग झाल्यानंतर त्याअंतर्गत या कै.सखाराम मुकुंद कवळी मार्ग (चाळपेठ ते क्रॉसनाका) या रस्त्याची दुरूस्ती करावी म्हणून आपण जिल्हापरिषद, पंचायत समिती, माजी आमदार हितेंद ठाकूर यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. तसेच प्रत्यक्ष अधिकाऱ्यांच्या भेटीही घेतल्या होत्या. त्यामुळेच रस्त्याचे काम सुरू झाले असे म्हणणे कवळी यांनी मांडले आहे. जनआंदोलनचे स्थानिक नगरसेवक केवळ राजकारण करतात. अर्धा रस्ता एमजेपीने वर्ग केलेल्या निधीतून होत आहे. तर उर्वरित रस्ता करण्याबद्दल आपण पालिकेला विनंती केली आहे.

रस्त्यांच्या या कामांचे श्रेय आमचेच आहे, असा दावा कवळी यांनी केला. या कामाचे श्रेय घेण्यावरून जनआंदोलन व बविआत आता श्रेयाची लढाई होत आहे. मात्र सामान्य नागरिकांना काम होण्यातच अधिक रस असल्याचे दिसत आहे.

अनेक ठिकाणी उद्या माघी गणेशोत्सवाचे कार्यक्रम

E-mail Print PDF

नालासोपाऱ्यातील सर्वप्रथम माघी गणेशोत्सव मंडळ असलेले श्री चक्रेश्वर भजनी मंडळ, उमराळे यांचा माघी गणेशोत्सव गुरूवार, शुक्रवार २६ व २७ जानेवारी रोजी होणार असून श्री चक्रेश्वर मंदिराजवळ, उमराळे येथे गणेशभक्तांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

साईसिद्धी मित्र मंडळाने वाघोली, मोर आळी येथे धामिर्क विधींसह गुरूवारी रात्री विनोदी नाटकाचा प्रयोग आयोजित केला आहे. विरार पश्चिमेला असलेले मंगलमूतीर् मंदिर तसेच आगाशी चाळपेठ-पुरापाडा येथील गणेश मंदिरातही होणार आहेत. भुईगांव येथील श्री गणेश मित्रमंडळानेही भुईगाव, म्हात्रे आळी येथे गुरूवारी सकाळी प्रतिष्ठापना, महाप्रसाद, महाआरती, रात्री ९ वाजता स्वरगंध समधुर गाण्यांचा 'नादब्रम्ह' हा कार्यक्रम होणार आहे.

भाईंदर पूवेर्ला युथ युनायटेड वेल्फेअर सोसायटीने माघी गणेशोत्सवानिमित्त केबीन रोड, दीपक नगर येथे गुरूवारी पूजन व शुक्रवारी विसर्जन होईल. तर भाईंदर पश्चिमेला जमुनाबाई ठाकूर मार्गावरील सिद्धिविनायक मित्रमंडळातफेर्ही गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

पालघर तालुक्यात माहीम वागुळसार येथे गणेशजयंती साजरी करण्यात येणार आहे.

मतदानावर बहिष्काराचा इशारा

E-mail Print PDF

रानगाव ( वसई पश्चिम ) येथे तीन वर्षांत कुठलीही विकासकामे झाली नाहीत वा नागरिकांना कोणत्याही सार्वजनिक प्रकारच्या सार्वजनिक सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत . याच्या निषेधार्थ मतदारांनी पंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मनसे पक्षातर्फे घेण्यात आला आहे .

कलाकारांचा आज जल्लोष
पालघरमध्ये पहिल्यांदाच अवधूत गुप्ते लाईव्ह कॉन्सर्ट रंगणार आहे . शिवानंद ग्रुप पालघरतर्फे ' जल्लोष महाराष्ट्राचा ' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय . त्यामध्ये अवधूत गुप्तेसोबत क्रांती रेडकर , अभिजित खांडकेकर , जान्हवी प्रभु - अरोरा , पुष्कर श्रोत्री आदी कलाकार जल्लोष करणार आहेत . गुरुवार , २६ जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजता आर्यन शाळेच्या मैदानावर हा रंगारंग सोहळा रंगेल .
बाळासाहेबांच्या वाढदिवसांचे कार्यक्रम

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वसई , भाईंदर , बोईसर पट्ट्यात शिवसैनिकांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते . रविवारी नालासोपाऱ्यात सहा ठिकाणी शिवसैनिकांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ४२७ रक्तदात्यांनी रक्तदान केले . भुईगाव येथील आनंदाश्रमात आबाल - वृद्धांना धान्य , खाऊ , फळ वाटप करण्यात आले . वॉर्ड क्रमांक ४५ मध्ये महिलांसाठी तीळगुळ समारंभ पार पडला . विरार शहरात वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर , ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र , ९४ रूपयात पॅनकार्ड , गरजूंना ब्लँकेट वाटप असे कार्यक्रम केले .

पाककला स्पर्धा
वसईतील समाजउन्नती मंडळ , माणिकपूर या संस्थेने ६८ व्या वर्षात पदार्पण केले असून मंडळ विविध सामाजिक , सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत . मंडळाच्या महिला विभागातर्फे २६ जानेवारी रोजी हळदीकंुकू व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .

नारायण मानकर यांची निवड
वसईतील ' वसई विकासिनी ' या संस्थेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नारायण मानकर यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली . गेली ६ वर्ष मानकर हे या संस्थेच्या अध्यक्षपदी काम करीत असून ही संस्था अनेक उपक्रम , कार्यक्रम राबवत असते .

विज्ञान प्रदर्शनात सावे महाविद्यालय प्रथम
जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात पालघर तालुक्यातील तारापूर एज्युकेशन सोसायटीच्या हरेश्वर दामोदर ( भाउसाहेब ) सावे कनिष्ट महाविद्यालयाला जिल्हा स्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला . भाईंदर येथील अभिनव विद्यामंदिर घोडदेव येथे आयोजित करण्यात आले होते . बारामती येथे २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सावे महाविद्यालायाने तयार केलेली प्रतिकृती मांडण्यात येाणार आहे .

बंद घरांमध्ये चोरी
गेले काही दिवस माणिकपूर , वसई , नालासोपारा , विरार भागात घरफोडीचे अनेक गुन्हे घडले आहेत . नोकरीनिमित्त सकाळीच घरातील दाम्पत्य बाहेर पडल्यानंतर अशा बंद घरांवर वॉच ठेऊन घरफोडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे . यामुळे घरे लॉक करताना काळजी घ्यावा , असे आवाहन करण्यात आले आहे . नालासोपारा पश्चिम , चौथा रस्ता , श्रीप्रस्थ भागातील फुलवा कॉम्प्लेक्सचे रहिवासी मधुकर तांबे यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम नुकतीच चोरून नेण्यात आली .

वर्तक कॉलेजमध्ये 'उडाण महोत्सव'

E-mail Print PDF

वसईच्या अण्णासाहेब वर्तक कॉलेजमध्ये मंुबई विद्यापीठाच्या 'आजीवन शिक्षण आणि विस्तार सेवा' विभागाच्या वतीने २० व २१ जानेवारी रोजी दोन दिवसीय 'उडाण महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात मुंबई विद्यापीठाची जवळ-जवळ ३५ कॉलेज सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून या महोत्सवाचे आयोजन केले जाते.

वसईच्या वर्तक कॉलेजमध्ये अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांचे दरवषीर् आयोजन होत असते. त्याला विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळतो. या उडाण महोत्सवात सहभागी कॉलेजातील विद्यार्थ्यांसाठी पथनाट्य, पोस्टर मेकिंगस्पर्धा घेण्यात येतात. या महोत्सवात सुमारे ६०० विद्याथीर् व त्यांचे शिक्षक सहभागी होणार आहेत. हा महोत्सव वसई येथील अण्णासाहेब वर्तक कॉलेजच्या मामासाहेब मोहोळ हॉल, नवीन इमारत येथे होणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मंुबई विद्यापीठाच्या 'आजीवन शिक्षण आणि विस्तार सेवा' विभागाचे संचालक डॉ. दिलीप पाटील हे उपस्थित राहणार असल्याचे प्राचार्य डॉ. सुशील केळकर यांनी सांगितले. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. त्यामध्ये नाट्यप्रवेश व नृत्य पाहण्यासारखे असतात असे ते म्हणाले. या महोत्सवाचा

विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व आपल्या कला-गुणांचा प्रत्यय द्यावा, असे आवाहन डॉ. केळकर व विस्तार सेवा शिक्षक डॉ. शत्रुघ्न फड यांनी केले आहे.

Page 1 of 60

  • «
  •  Start 
  •  Prev 
  •  1 
  •  2 
  •  3 
  •  4 
  •  5 
  •  6 
  •  7 
  •  8 
  •  9 
  •  10 
  •  Next 
  •  End 
  • »
 

Poll

Are you comfirtable with phone/email invitations?





Results

Login Form

You are here: Home