रानगाव ( वसई पश्चिम ) येथे तीन वर्षांत कुठलीही विकासकामे झाली नाहीत वा नागरिकांना कोणत्याही सार्वजनिक प्रकारच्या सार्वजनिक सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत . याच्या निषेधार्थ मतदारांनी पंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मनसे पक्षातर्फे घेण्यात आला आहे .
कलाकारांचा आज जल्लोष
पालघरमध्ये पहिल्यांदाच अवधूत गुप्ते लाईव्ह कॉन्सर्ट रंगणार आहे . शिवानंद ग्रुप पालघरतर्फे ' जल्लोष महाराष्ट्राचा ' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय . त्यामध्ये अवधूत गुप्तेसोबत क्रांती रेडकर , अभिजित खांडकेकर , जान्हवी प्रभु - अरोरा , पुष्कर श्रोत्री आदी कलाकार जल्लोष करणार आहेत . गुरुवार , २६ जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजता आर्यन शाळेच्या मैदानावर हा रंगारंग सोहळा रंगेल .
बाळासाहेबांच्या वाढदिवसांचे कार्यक्रम
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वसई , भाईंदर , बोईसर पट्ट्यात शिवसैनिकांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते . रविवारी नालासोपाऱ्यात सहा ठिकाणी शिवसैनिकांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ४२७ रक्तदात्यांनी रक्तदान केले . भुईगाव येथील आनंदाश्रमात आबाल - वृद्धांना धान्य , खाऊ , फळ वाटप करण्यात आले . वॉर्ड क्रमांक ४५ मध्ये महिलांसाठी तीळगुळ समारंभ पार पडला . विरार शहरात वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर , ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र , ९४ रूपयात पॅनकार्ड , गरजूंना ब्लँकेट वाटप असे कार्यक्रम केले .
पाककला स्पर्धा
वसईतील समाजउन्नती मंडळ , माणिकपूर या संस्थेने ६८ व्या वर्षात पदार्पण केले असून मंडळ विविध सामाजिक , सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत . मंडळाच्या महिला विभागातर्फे २६ जानेवारी रोजी हळदीकंुकू व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .
नारायण मानकर यांची निवड
वसईतील ' वसई विकासिनी ' या संस्थेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नारायण मानकर यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली . गेली ६ वर्ष मानकर हे या संस्थेच्या अध्यक्षपदी काम करीत असून ही संस्था अनेक उपक्रम , कार्यक्रम राबवत असते .
विज्ञान प्रदर्शनात सावे महाविद्यालय प्रथम
जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात पालघर तालुक्यातील तारापूर एज्युकेशन सोसायटीच्या हरेश्वर दामोदर ( भाउसाहेब ) सावे कनिष्ट महाविद्यालयाला जिल्हा स्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला . भाईंदर येथील अभिनव विद्यामंदिर घोडदेव येथे आयोजित करण्यात आले होते . बारामती येथे २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सावे महाविद्यालायाने तयार केलेली प्रतिकृती मांडण्यात येाणार आहे .
बंद घरांमध्ये चोरी
गेले काही दिवस माणिकपूर , वसई , नालासोपारा , विरार भागात घरफोडीचे अनेक गुन्हे घडले आहेत . नोकरीनिमित्त सकाळीच घरातील दाम्पत्य बाहेर पडल्यानंतर अशा बंद घरांवर वॉच ठेऊन घरफोडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे . यामुळे घरे लॉक करताना काळजी घ्यावा , असे आवाहन करण्यात आले आहे . नालासोपारा पश्चिम , चौथा रस्ता , श्रीप्रस्थ भागातील फुलवा कॉम्प्लेक्सचे रहिवासी मधुकर तांबे यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम नुकतीच चोरून नेण्यात आली .
| Next > |
|---|








