वटार गावातील चार तलावांचा लिलाव वसई-विरार महापालिकेने जाहीर केला होता. मंगळवारी सकाळी उपायुक्तांच्या उपस्थितीत लिलावाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर येथे जमलेल्या ग्रामस्थांनी ही प्रक्रिया बंद पाडली. महापालिकेतून गावे वगळण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे जोपर्यंत गावे वगळली जात नाहीत तोपर्यंत हा लिलाव करू नये, असे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले.
प्रभाग क्रमांक ९ मधील वटार ग्रामपंचायत हद्दीतील दोन तलाव, वरळी तलाव, भोंगाळे तलाव, वरमाळे तलाव या तलावांचा महापालिकेने मासळी सोडणे व मारणे यासाठी २०१०-११ या वर्षासाठीचा लिलाव जाहीर केला होता. लिलावाच्या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी ९ जण वटार येथील सध्याच्या पालिकेच्या ऑफिसमध्ये उपस्थित होते. साडेबारा वाजता उपायुक्त देविदास टेकाळे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळेस नगरसेविका ज्योती ठाकूर यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी आपले उपायुक्तांकडे म्हणणे मांडले.
महापालिकेतून ही गावे वगळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना पालिकेच्या वतीने होणाऱ्या कोणत्याही लिलावाला सर्व ग्रामस्थांचा विरोध आहे. हा लिलाव ग्रामस्थांना विश्वासात न घेता किंवा ग्रामस्थांना अंधारात ठेऊन केला तर जनउदेक होईल, असा इशारा नगरसेविकेसह ग्रामस्थांनी दिला. पालिकेला लोकांचा विरोध असल्याने प्रसंगी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी म्हटले. वटार परिसरातील ग्रामस्थांनी हा लिलाव स्थगित करावा, असे निवेदनही सादर केले. यावेळी लिलावासाठी आलेल्यांना या प्रक्रियेत भाग घेता आला नाही. मंगळवारी हा लिलाव होऊ न शकल्याने आता यावर चर्चा करून महापालिका बुधवारी निर्णय घेईल, असे समजते.
| < Prev | Next > |
|---|









Comments
It was understood that the Auction was held again and all four ponds/lakes were win by outsiders' (seemed) names.... news in maharastra Times....3-4 weeks back.....
Also mention date in the news.... so that reference is valid....
दोन तलाव, वरळी तलाव, भोंगाळे तलाव, वरमाळे
तलाव या तलावांचा महापालिकेने मासळी सोडणे व
मारणे यासाठी २०१०-२०११ या वर्षासाठीचा लिलाव
जाहीर केला होता. ६ जुलै रोजी उपायुक्त टेकाळे
...
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6174742.cms-68k- Cached- Similar Pages
Thanks for providing news of our beloved vasai.
If you could update the news of vasai,it will great favour.
Thanks