बुडाली बुडाली बुडाली वसई विरार महापालिका बुडाली
जय हो वसई विरार महानगरपालिका
जय हो माजी नगरपरिषदा
जय हो आजी माजी नगरसेवक
जय हो CIDCO आणि MMRDA
जय हो आयुक्त आणि प्रशासक
जय हो महापौर
जय हो पश्चिम रेल्वे
जय हो विकासवाले
आणि धन्य हो जनता
विरार - नालासोपारा पाण्याखाली - तथाकथित विकासकांना निसर्गाची चपराक
वसई विरार परिसरात काल संध्याकाळ पासून कोसळणाऱ्या पावसाने विरार व नालासोपारा शहरांत पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नालासोपारा पूर्व भागातील सर्व अनअधिकृत चाळी पूर्णतः पाण्याखाली बुडाल्या आहेत तर अनेक इमारतींचा खालचा मजला ५-६ फुट बुडाला आहे. विरार व नालासोपारा मध्ये रुळावर पाणी भरल्याने विरारहून मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या सर्व गाड्या १ तास उशिराने धावत होत्या. पुढच्या २४ तासात जर पावसाचा जोर असाच राहिला तर विरार वसई पासूनची रेल सेवा पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने लोकांचे अतोनात हाल होत आहेत तसेच अनेकांच्या घरातील सामानांचे नुकसान झाले आहे.
CIDCO & येथील नगरपरिषदांच्या गलथान व भ्रष्टाचारी कारभारामुळे निर्माण झालेल्या हजारो अनधिकृत बांधकामांतून येथील जनतेवर ही परिस्थिती ओढवली आहे. डोंगर फोडून प्रचंड प्रमाणत झालेल्या मातीच्या भरावामुळे सर्व नैसर्गिक मार्ग बंद झाले आहेत व त्यामुळे पूर्वेकडील डोंगरावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने हा संपूर्ण परिसर ४-६ फुट पाण्याखाली गेला आहे. त्याच प्रमाणे नालासोपारा व विरारच्या पश्चिमेस रेलवेने उभारलेला कारखानाही ह्या पुरास
जबाबदार आहे असे येथील जानकरांचे मत आहे. नजीकच्या काळात हा संपूर्ण परिसर पाण्याखाली जाण्याची भीती नागरिकांत व्यक्त केली जात आहे. येथील तथाकथित विकासकांनी अवलंबिलेल्या अनियोत बांधकाममुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच प्रमाणे ह्या सर्व भरावाचा संपूर्ण ताण वसई विरारच्या हरित पत्त्यावरही पडत आहे. ह्या ठिकाणीही अनेक भागात पाणी साचल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे व त्यामुळे अनेक बागायतदारांचे नुकसान झाले आहे.
मागील २० वर्षापासून येथील भूमिपुत्र ह्या अनियोजित विकासाच्या विरोधात अनेक आंदोलने करीत राहिला परंतु येथील प्रस्थापितांनी व काँग्रेसी सरकारांनी त्यांच्या तोंडाला फक्त पानेच पुसली. ज्या शरद पवारांनी ह्या भागाचा विकास करण्यासाठी १९९० मध्ये स्थानिकांच्या प्रचंड विरोधाला न जुमानता CIDCO लादली त्यांच्याच कॉंग्रेस सरकारने नवीन महानगरपालिकेच्या सत्ताधार्यांच्या प्रेमापोटी CIDCO ला रातोरात रामराम ठोकला. सत्ता आणि पैश्याच्या लालसेपायी येथील प्रस्थापित व सरकार वसई विरार परिसराला एक दिवस अरबी समुद्रात तिलांजली दिल्याशिवाय राहणार नाही.
एक गोष्ट आमच्या लक्षात येत नाही......
स्थानिकांना विचारात न घेता महापालिका लादण्याचा निर्णय रातोरात होतो. पुढे जावून आणखीन २ गावे महापालिकेत रातोरात समाविष्ट केली जातात, CIDCO ची रातोरात हकालपट्टी केली जाते...पण जनतेच्या आक्रमक विरोधानंतर गावे वगळण्यासाठी अनेक प्रकारच्या प्रक्रिया कराव्या लागतात?....आणि त्यासाठी तब्बल १ वर्ष लागावे?
नक्की सरकार कोणासाठी काम करते? जनतेसाठी कि जनतेने निवडून दिलेल्या लोक प्रतिनिधीसाठी?
विजय मच्याडो
| < Prev | Next > |
|---|








