वसईच्या अण्णासाहेब वर्तक कॉलेजमध्ये मंुबई विद्यापीठाच्या 'आजीवन शिक्षण आणि विस्तार सेवा' विभागाच्या वतीने २० व २१ जानेवारी रोजी दोन दिवसीय 'उडाण महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात मुंबई विद्यापीठाची जवळ-जवळ ३५ कॉलेज सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून या महोत्सवाचे आयोजन केले जाते.
वसईच्या वर्तक कॉलेजमध्ये अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांचे दरवषीर् आयोजन होत असते. त्याला विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळतो. या उडाण महोत्सवात सहभागी कॉलेजातील विद्यार्थ्यांसाठी पथनाट्य, पोस्टर मेकिंगस्पर्धा घेण्यात येतात. या महोत्सवात सुमारे ६०० विद्याथीर् व त्यांचे शिक्षक सहभागी होणार आहेत. हा महोत्सव वसई येथील अण्णासाहेब वर्तक कॉलेजच्या मामासाहेब मोहोळ हॉल, नवीन इमारत येथे होणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मंुबई विद्यापीठाच्या 'आजीवन शिक्षण आणि विस्तार सेवा' विभागाचे संचालक डॉ. दिलीप पाटील हे उपस्थित राहणार असल्याचे प्राचार्य डॉ. सुशील केळकर यांनी सांगितले. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. त्यामध्ये नाट्यप्रवेश व नृत्य पाहण्यासारखे असतात असे ते म्हणाले. या महोत्सवाचा
विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व आपल्या कला-गुणांचा प्रत्यय द्यावा, असे आवाहन डॉ. केळकर व विस्तार सेवा शिक्षक डॉ. शत्रुघ्न फड यांनी केले आहे.
| < Prev | Next > |
|---|








